Business Name
Select Category
Select City
Select Area
                         
Weather
Badlapur Weather
Advertisement
Click Here

     बदलापूर हे वैभवशाली, अध्यात्मिक, सामाजीक आणि पर्यटनाचे केंद्रबिंदू म्हणून समृद्ध आहे, तसेच क्रीडा क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत, कलेपासून ते उद्योग क्षेत्रापर्यंत, दरवळणाऱ्या आध्यात्मापासून ते शेतीपर्यंत, अश्या अनेक क्षेत्रात बदलापूर मधील व्यक्तींनी आणि संस्थांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. शहरातून जाणारे व महत्त्वाच्या औद्योगिक शहरांना जोडणारे महामार्ग व पर्यटनाचा केंद्रबिंदू असल्याने व्यवसायही वाढत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही बदलापूर आकर्षित करत आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूरच्या व्यावसायिक जगात मानाचं पान दाखल होत आहे "बदलापूरलिंक डॉट कॉम" च्या रूपाने.

     बदलापूरमधील सर्व क्षेत्रातल्या नवीन आणि प्रस्थापित व्यवसाय वाढीच्या दृष्टीने बदलापूरलिंक डॉट कॉम हि वेबसाईट व्यवसायिकांना जाहिरातीसाठी हक्काचे स्थान देत आहे. नवीन व्यवसायाला लागणारे कॉपिराइट्स, ट्रेडमार्क, पेटंट्स याबद्दल सल्ला व समुपदेशही उपलबध होतंय. आता बदलापूरकरांमधील व्यावसायिकांसाठी हक्काची वेबसाईट तयार आहे. येथे आपली जाहिरात प्रसिद्ध करा आणि आपल्या व्यवसाय वाढीसाठी एक महत्वाचे पाऊल उचला. व्यवसायाच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या सेवाही उपलब्ध आहेत. आपल्या व्यवसायाची जाहिरात जगभरातून कुठूनही पाहता येते.

     बदलापूरलिंक डॉट कॉम चे प्रमुख उद्दिष्टं हे तुमच्या व्यवसाय वाढीमध्ये सहभागी होणं हे आहे. त्यासाठी जागतिक स्तरावरील जाहिरात क्षेत्रातील ताज्या बदलांसह बदलापूरलिंक डॉट कॉम सदैव कटिबद्ध आहे. आपल्या व्यवसाय वाढीसाठी बदलापूरलिंक डॉट कॉम वर जाहिरात देण्याचा तुमचा विचार पक्का झालाय ना...?
 
 
Timing
Click Here
Helpline Numbers
     Police
     Hospital
     Blood Bank
     Fire Brigade
     Ambulance Service